पुणे जिल्हा : तालुक्यांचा विकासाला माझे पहिले प्राधान्य – शंकर मांडेकर

हिंजवडीत मतदारांशी संवाद
हिंजवडी – स्वत: पुरते पाहण्यापेक्षा गावांसह तालुक्यांचा विकासाला माझे पहिले प्राधान्य असेल. मुळशी तालुक्यातील पर्यटनाला चालना देत, रोजगारनिर्मितीसाठी मोठ्या कंपन्या आपल्या तालुक्यात आणण्यासाठी माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही महायुतीचे भोर विधानसभेचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी दिली.
महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर मुळशी तालुक्यातील ताथवडे, जांबे, नेरे कासारसाई, दत्तवाडी, मारुंजी, हिंजवडी या गावांना भेट दिली. यावेळी मांडेकरांच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी ठिकठिकाणी मोठया प्रमाणात गर्दी केली. जेसीबीवरून पुष्पवृष्टी करून त्यांचे जंगी स्वागत केले. बैलगाडीवरुन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संतोष घोरपडे, जीवन कोंडे, दशरथ जाधव, सुनील गायकवाड,
किरण राऊत, राजाभाऊ रेणुसे, सुनील शेंडकर, कुंदन गंगावणे, अंकुश मोरे, राजाभाऊ वाघ, दीपक कारंजावणे, गोविंद निकाळजे, नंदू भोईर, पै. राजाभाऊ जाधव, संदीप पवार, विजय गायकवाड, दीपक टेमगिरे, योगेश शिंदे, गणेश गायकवाड, बाळासाहेब भिंताडे, आनंदा लाटे, गणपत जगताप, सागर साखरे, कपिल बुचडे, सचिन जांभुळकर, दिनेश पिंजन, कौस्तुभ शिखरे, गणेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
मांडेकरांनी मतदारसंघातील गाव आणि सोसायटीमध्ये मतदारांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या लवकरात लवकर सोडविण्याचे मांडेकर यांनी देत ते म्हणाले, मुळशी तालुका पुणे शहराच्या जवळ असूनही मुळशीतील गावांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. मुळशी तालुक्यात औद्योगीकरण नसल्यामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळत नाही. त्यामुळे तालुक्यातील युवा पिढीला बाहेरच्या तालुक्यांमध्ये जावं लागतं. याला सर्वस्वी जबाबदार कोण याचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मतदारसंघाचा विकासासाठी मला मतदानरूपी आशिर्वाद मिळावा, असे आवाहन मांडेकर यांनी केले.
महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकरभाऊ मांडेकर यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि.१७) रोजी भोर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले आहे. ही सभा दुपारी १ वाजता राजा रघुनाथराव विद्यालयाच्या मैदानावर होणार आहे.





