पुणे जिल्हा : विकसित भारत संकल्प यात्रा रथ

कोरेगाव भीमामध्ये योजनांचा जागर
कोरेगाव भीमा – “विकसित भारत संकल्प यात्रेत” केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात येत आहे. यात चित्ररथ वाहनाबरोबर केंद्र शासनच्या पी. एम स्वनिधी योजना, आयुष्मान भारत जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, आधार अपडेट गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना व मोफत आरोग्य तपासणी अशा विविध योजनांची माहिती वंचित नागरिकांपर्यत पोहोचवण्यात येत आहे.
कोरेगाव भीमा येथे पुणे जिल्हा परिषद आयोजित विकसित भारत संकल्प चित्ररथाचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच विक्रम गव्हाणे, उपसरपंच गणेश कांबळे, ग्रामपंचायत सदस्य केशव फडतरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अनिल काशीद, घोडगंगा कारखाना माजी संचालक कैलास सोनवणे,
संयोजक, शिरूर तालुका भाजपा उपाध्यक्ष संपत गव्हाणे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस नितीन गव्हाणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण फडतरे, शिरूर तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष अमोल गव्हाणे, सरचिटणीस रवींद्र गव्हाणे, चिटणीस भारती उमेश गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्य अनिकेत गव्हाणे, मनीषा संपत गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी रतन दवणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.





