Pune District : राजेवाडीतून देव निघाले लग्नाला; श्रीनाथ म्हस्कोबाच्या पालखीचे वीरकडे प्रस्थान

वाघापूर : नाथ साहेबाचे चांगभले सवाई सर्जाच चांगभले असा जयघोष करत राजेवाडी तालुका पुरंदर येथील श्रीनाथ म्हस्कोबाची पालखी वीरकडे रवाना झाली.
राजेवाडी येथे श्रीनाथ म्हस्कोबा देवाचा साखरपुडा तसेच हळदीचा कार्यक्रम झाला. यानंतर मंगळवारी (दि. 11) श्रीनाथ म्हस्कोबाची पालखी देवाला घेऊन वीरकडे पारगाव मेमाणे, वाळुंज, शिवरी, शिंदेवाडी घाट, परिंचे नवलेवाडी, राऊतवाडी व शेवटी वीर गाव असा पायीप्रवास करून वीर येथे दाखल झाली.
यात्रा काळामध्ये वीर येथे यात्रेचे स्वरूप आलेलं असतं या कालावधीमध्ये गावातील शेकडो भाविक महिला वीर येथे लग्न सोहळ्यासाठी आपापल्या बैलगाडी असेल तसेच विविध वाहनांमधून वीर येथे मुक्कामी असतात.
या कालावधीमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते अशी माहिती राजेवाडी येथील श्रीनाथ म्हस्कोबा पालखी सोहळ्याचे प्रमुख रामदास दशरथ बधे तसेच हनुमंत बधे यांनी दिली.





