Pune District : उपमुख्यमंत्री शिंदेंकडून जेवरेंच्या पाठीवर कौतुक थाप

मुंबईत सत्कार करीत परिवाराचा सन्मान
बारामती – येथील शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख सुरेंद्र जेवरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना नुकताच महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जेवरे यांच्या या कार्याची दखल घेतली. जेवरे यांच्यावर कौतुकाची थाप टाकत त्यांचा व त्यांच्या परिवाराचा सन्मान एकनाथ शिंदे यांनी केला. त्यामुळे पुणे जिल्हा व बारामती परिसरात जेवरे यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
गेले अनेक वर्ष सामाजिक कार्याच्या माध्यमातून सुरेंद्र जेवरे कार्यरत आहेत. सध्या ते शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रमुख म्हणून धुरा सांभाळत आहेत. नागरिकांच्या समस्या व प्रश्न सोडवण्यावर त्यांचा विशेष भर आहे. वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी केलेली आंदोलने लक्षवेधी ठरली आहेत. यावेळी आरोग्य शिबिरे, स्वच्छता उपक्रम, मार्गदर्शनपर व्याख्याने, तरुणांसाठी आरोग्य जागृती, शासकीय योजना जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे जसे की बांधकाम कामगार योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना,
विद्यार्थ्यांसाठी एसटी पास योजना, विद्यार्थ्याना शैक्षणिक दाखले, गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्य योजना, घरपट्टी शास्तीकर अभय योजना अशा विविध लोकोपयोगी योजना त्यांनी प्रभावीपणे राबविल्या आहेत. त्याची दखल सर्वस्तरातून घेतली जात आहे. राजकारणाला समाजकारणाची जोड देत त्यांचे कार्य सुरू आहे. त्यांच्या समाजउपयोगी कार्य शैलीमुळे ते सर्वत्र परिचित आहेत. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी विश्वास संपादन केला आहे.
गेले अनेक वर्ष विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांच्या हिताची कामे केली जात आहेत. नागरिकांचे देखील प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे. यापुढील काळात देखील नागरिकांच्या हिताची कामे व त्यांच्या प्रश्नांवर संघर्ष करत राहणार आहे.
– सुरेंद्र जेवरे, शिवसेना, पुणे जिल्हा प्रमुख.





