माझ्या वडिलांची निराशा गा देवा विठोबाचिया पायी वाहिली सेवा ॥ दीनाचे दु:ख हरावे तू राया तुझिया दर्शनाने सुख लाभे माया ॥ एकवटले मनी तुजपायी भाव तुजवाचून दुजा न आठवे नाव ॥ तुझिया चरणाशी हे मस्तक ठेवितो सोपान म्हणे आता कृपा तुझी होवो ॥ अमोल बनकर सासवड – संत सोपानकाकांच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा होऊन देऊळवाड्याच्या उत्तर दरवाजातून पालखी दुपारी 12 च्या सुमार बाहेर पडली. या वेळी हजारो भाविकांनी माऊली व सोपानकाकांचा जयघोष केला. फुलांची उधळण केली.भाविकांनी पालखी खांद्यावर घेऊन सासवड गावातून मिरवत जेजुरी नाक्यापर्यंत आणली. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ ज्ञानदेव तुकाराम यांंचा जयघोष करीत प्रस्थान ठेवले. त्याप्रसंगी रस्त्याच्या दुतर्फा हजारो भाविकांनी पालखीदर्शनाचा लाभ घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात, ग्यानबा-तुकारामच्या जयघोषात, भगव्या पताकांच्या गर्दीत हजारो वैष्णवांच्या साक्षीने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू संत सोपानकाका महाराजांच्या पालखीचे आषाढवारीसाठी सोमवारी (दि. 23) सासवडवरून उत्साही वातावरणात प्रस्थान झाले. संत सोपानकाका महाराजांची पांगारे गावाकडे पालखी रवाना झाली. या वर्षी मोठ्या प्रमाणात वारकरी उपस्थिती होते. पहाटे काकड आरती, महापूजा व धार्मिक विधी संपन्न झाले. त्यानंतर पहाटे पासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा सासवड येथे मुक्काम असल्याने संत सोपानदेवांच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सकाळी 10 वाजता प्रस्थान सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्वप्रथम मानाच्या दिंड्यांना मंदिरात घेण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मानाच्या दिंडीप्रमुखांचे अभंग संपन्न झाले. देवघरातून सोपानकाकांच्या पादुका आणून वीणामंडपातील पालखीमध्ये विधिवत स्थानापन्न केल्या. त्यानंतर सोपानदेव देवस्थान ट्रस्ट, संत सोपानकाका सहकारी बँकेच्या वतीने सर्व दिंडीप्रमुखांच्या सत्काराचा कार्यक्रम झाला. पालखीने देऊळवाड्यातून पालखीने हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रस्थान ठेवले. सोपानदेव चौक, छत्रपती शिवाजी महाराज मंडळ चौक, अमर चौक, कन्हैया चौक मार्गे जेजुरी नाका पालखीचा पहिला विसावा पिंपळे या ठिकाणी झाला त्यानंतर पांगारे या ठिकाणी पालखी मुक्कामी विसावली. सोपानकाका बँकेच्या वतीने माजी आमदार संजय जगताप यांच्या हस्ते सर्व दिंडीप्रमुखांस श्रीफळ देण्यात आले. संत सोपानकाकांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याप्रसंगी देवस्थानचे प्रमुख ॅड. त्रिगुण गोसावी, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, आमदार विजय शिवतारे तहसीलदार विक्रम रजपूत, सासवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण, माजी नगरसेवक सुहास लांडगे उपस्थित होते. जेजुरी नाका येथे सासवड नगरपालिका यांच्या वतीने सर्व विणेकरी आणि दिंडीप्रमुख यांचा सत्कार करून पालखी रथामध्ये ठेवण्यात आली. या वेळी सासवड व परिसरातील हजारो भाविक पालखी सोहळ्यास निरोप देण्यासाठी उपस्थित होते. वारीदरम्यान दररोज सोपानकाका बँकेच्या वतीने रथाला फुलांची सजावट करण्यात येणार आहे. रथासाठी सोरटेवाडी येथील केंजळे परिवार यांना मान मिळाला असून नगार्या साठी निरा येथील नितीन कुलकर्णी यांचा बैलजोडीचा मान आहे. तर अंजनगावचे अजित परकाळे यांचे अश्व असणार आहे. तसेच संत सोपानकाका बँकेच्या वतीने फुलांची सजावट करणार आहे जेजुरी नाक्यावर हजारो भाविकांनी पालखीला निरोप दिल्यानंतर हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झाला. श्री संत सोपान काका पालखीचा पिपळे येथे विसावा तर पांगारे येथे मुक्काम आहे. या वर्षी श्री संत सोपान काका महाराज पालखी सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर गर्दी पहावयास मिळाली. पुढे 27 तर मागे 88 दिंड्या सोपानकाका पालखी बरोबर 115 दिंड्या असून पुढ 27 तर मागे 88 दिंड्या राहणार आहेत अशी माहिती मुख्य विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख त्रिगुण गोसावी यांनी दिली यावेळी देवस्थानचे चोपदार सिद्धेश शिंदे उपस्थित होते. देवस्थानांचे प्रतिनिधी व दिंडीप्रमुख, सासवडचे सर्व नगरसेवक, ग्रामस्थ व हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. आज सकाळी पालखी सोहळ्याचे प्रमुख ऑड. त्रिगुण गोसावी यांच्या घरात सोपानदेव महाराज यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले.