पुणे जिल्हा : पिता-पुत्र भेट पालखी सोहळ्याचे शुक्रवारी शिवनेरीवरून प्रस्थान

छत्रपती शिवाजी महाराज – छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळा
मंचर: छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज पिता-पुत्र भेट पालखी सोहळ्याचे शुक्रवारी (दि. ५) श्री शिवनेरी गड शिवजन्मभूमी (ता. जुन्नर) येथून प्रस्थान होईल, अशी माहिती स्वराज्य संघाचे अध्यक्ष पालखी सोहळा प्रमुख संयोजक बाजीराव महाराज बांगर यांनी दिली .
या प्रस्थान सोहळ्यासाठी देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, मिलिंदभाऊ एकबोटे, पंडित मोडक या मान्यवरांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान होणार आहे. स्वराज्य संघाचे अध्यक्ष पालखी सोहळा विश्वविक्रमी कीर्तनकार प्रमुख संयोजक बाजीराव महाराज बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळा श्री पुरंदर गडाच्या दिशेने मार्गस्थ होईल.
नारायणगाव, मंचर, पेठ, राजगुरुनगर सायंकाळी श्री भैरवनाथ मारुती मंदिर चांडोली, खेड या ठिकाणी पालखी मुक्कामी असेल. ६ जानेवारीला चाकण, श्री संग्राम दुर्ग, श्रीक्षेत्र आळंदी, मरकळ, श्रीक्षेत्र तुळापूर आणि श्रीक्षेत्र वढू बुद्रुक संभाजी महाराज समाधी स्थळावर पालखी मुक्कामी राहील.
७ जानेवारी रोजी लोणीकंद, वाघोली, केसनंद, कोलवडी व श्रीक्षेत्र थेऊर गणपती येथे पालखी मुक्कामी राहील. दि. ८ जानेवारी रोजी थेऊर फाटा, लोणी, काळभोर, फुरसुंगी, वडकी नाला, दिवेघाटमार्गे सासवड आणि सायंकाळी श्री देवनाथ म्हस्कोबा महाराज मंदिर कोडीत येथे पालखी मुक्कामी राहील. ९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता श्रीक्षेत्र नारायणपूर व श्री पुरंदर गड येथे पालखी पोहोचेल भेटीचा सोहळा होईल, अशी माहिती स्वराज्य संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब दिघे व सचिव शामकांत निघोट यांनी दिली.





