पुणे जिल्हा : शिरूर तालुक्यात तांदळी येथे प्रथमच देवराई प्रकल्प

शिरूर : तांदळी ता. शिरुर येथील सदाशिव, महादेव ,वामन, जयसिंग व रावसाहेब बापुराव कळसकर यांची आई स्वर्गीय द्वारकाबाई बापुराव कळसकर यांच्या स्मरणार्थ तांदळी येथे भव्य देवराई प्रकल्पाचे वृक्षारोपण समारंभ पार पडला.
हे वृक्षारोपण करण्याकामी रघुनाथ ढोणे यांच्या देवराई प्रकल्प चे फार मोठे मार्गदर्शन व मदत मिळाली. तसेच तांदळी ग्रामपंचायतीचे देखिल या वृक्ष लागवडीसाठी मोलाचे सहकार्य मिळाले.
गावातील शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी, शिक्षकवृंद व तांदळी ग्रामस्त यांनी देखील वृक्षरोपणास सहभाग घेतला होता.. सदर जागेत ११८ प्रकारची देशी, आयुर्वेदिक औषधी वनस्पती, फळझाडे, फुलझाडे, वेली लावण्यात आल्या आहेत. या प्रकल्पाने तांदळी गावच्या वैभवात भर पडली असुन निसर्ग संवर्धनाच्या कामात नक्कीच हातभार लागला आहे.
शिरूर तालुक्यातील हा पहिलाच देवराई चा प्रकल्प अॅड .गणेश कळसकर यांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आला.वृक्षमित्र रविंद्र गोरे, तांदळी गावाचे वन अधिकारी महेश खोरे यांनी देखिल शालेय विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे घोडनदी वकील संघटनेचे अध्यक्ष अमित खेडकर व उपाध्यक्ष यमराज शिंदे यानीही विशेष मार्गदर्शन केले.
यावेळी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे, ग्रामपंचायत सदस्य गणेश गदादे, दिलीप सोनवणे, सावता गदादे, लहु खोरे, अमोल कळसकर, तसेच उपसरपंच सुभाष कळसकर, तांदळी पोलीस पाटील विशाल गदादे, माजी पोलीस पाटिल पोपट निंबाळकर, रमेश साळुंखे, तांदळी ग्रामपंचायती चे सर्व पदाधिकारी व समस्त तांदळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





