Pune District : देहू, आळंदी ते सिंगापूर पादुका प्रस्थान

आळंदी : भक्तीपथ सेवा फाऊंडेशनद्वारा आयोजित विश्व भ्रमण दिंडी तीर्थक्षेत्र देहू या ठिकाणाहून प्रस्थान करत आहे. जगद्गुरू संत तुकोबारायांच्या 375 वया अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त सिंगापूर या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराजांची बीज वर्षे तिसरे साजर करत आहोत.
पहिल्या वर्षी माऊलीचा सोहळा दुबईमध्ये साजरा केला. दुसर्या वर्षी नामदेवरायाचा सोहळा मलेशियात साजरा केला आणि आता तिसर्या वर्षी जगद्गुरू तुकोबारायाचा सोहळा सिंगापूरला साजरा होत आहे. यावेळी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरामधून प्रस्थान झाले.
यावेळी मंदिराच्या मुख्य गाभार्यातून दिंडी प्रदिक्षणा खूप मोठ्या उत्साहात सिंगापूर दिशेने निघाली. यावेळी अनेक मंडळीचे सहकार्य लाभले यात आळंदी शहर शिवसेना प्रमुख राहुल चव्हाण यांनी भाविकांसाठी देहू ते मुंबई एअरपोर्ट बसचे नियोजन केले.
यावेळी रामायणाचार्य शंकरमहाराज फपाळ, राहुल चव्हाण, विश्वभ्रमण दिंडी प्रमुख शेषजीमहाराज, स्वामी भारतानंद सरस्वती महाराज, हनुमान घोंगडे, नितीन ननवरे, दिनेश कुर्हाडे, सचिन शिंदे, एम. डी. पाखरे,अनील जोगदंड, सचिन शिंदे, माधवी थिटे, अनिता ढोरे, सुषमा शरद जाधव हे उपस्थित होते.
रविवारी सिंगापुरात बीज उत्सव
संत तुकाराम महाराज बीज उत्सव दि. 16 मार्च रोजी हिंदू टेम्पल सिंगापूर येथे संपन्न होणार आह. यावेळी स्वामी भारतानंद सरस्वतीमहाराज यांचे बीज सोहळ्यानिमित्त कीर्तन होईल व संत तुकाराम महाराज गाथा, चरित्र पुस्तकाचे वितरण होईल, असे भक्ती पथ सेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेषजी यांनी सांगितले.





