पुणे जिल्हा : हलगर्जीपणाने नवजात बालकाचा मृत्यू

भोर येथील उपजिल्हा रुग्णालयातील भोंगळ कारभार उघडकीस
प्रसूतितज्ज्ञ, भूलतज्ज्ञच रुग्णालयात नाही
भोर – भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात महिलेच्या प्रसूतीवेळी ड्युटीवर असलेले डॉक्टर आणि परिचारिका यांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालक दगावले असल्याची माहिती महिलेच्या नातेवाइकांनी दिली.
दुर्गम डोंगरी भागातील नांदगाव (ता. भोर) येथील गर्भवती महिलेस शुक्रवारी (दि. 7) भोरच्या उपजिल्हा रुग्णालयात रात्री 10 या सुमारात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. यावेळी या महिलेच्या प्रसूतीवेळी डॉ. रोहित काळे, दोन आरोग्य सेविका रुग्णालयात होते. मात्र, यावेळी परिचारिका या गर्भवती महिलेच्या नातेवाइकांना तुम्ही काही काळजी करु नका, प्रसूतीला वेळ लागेल, उद्याचे 11 वाजतील असे सांगून कर्तव्यात कसूर करत होत्या.
मात्र याचवेळी गर्भवती महिलेची प्रकृती गंभीर झाली होती. तिचे सिझेरिअन करा, डॉक्टरांना बोलावून घ्या अशी विनंती महिलेचे नातेवाइक करीत असतानाही याकडे परिचा रिकांनी दुर्लक्ष केले. पहाटे 6 च्या सुमारास प्रसूतीचा विषय गंभीर झाला असताना तब्बल 10 तासानंतर कर्तव्यावर असणारे डॉ. रोहित काळे तेथे आले. त्यांनी प्रसूतितज्ज्ञ, तसेच भूलतज्ज्ञ डॉक्टर नसल्याचे सांगितले.
यावेळी महिलेच्या नातेवाइकांनी खासगी डॉक्टर आशिष बुरांडे यांच्याशी संपर्क साधून त्यांना रुग्णालयात बोलवून घेतले आणि या महिलेवर प्रसूतीचे उपचार सुरू के ले. मात्र या प्रक्रियेत बराच वेळ गेल्यामुळे नवजात बालकाचा 15 मिनिटांत मृत्यू झाल्याची घटना घडली.
गर्भवती महिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दहा तास असताना देखील रुग्णालयात प्रसूतितज्ज्ञ, भूल तज्ज्ञ डॉक्टर कायमस्वरुपी नसल्यामुळे बालकाचा अंत झाल्याने या रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
परिचारिकांचे निलंबनाचा प्रस्ताव तयार केला असून, प्रस्ताव जिल्हा शल्यचिकि त्सकांकडे पाठवला जाणार आहे, तर डॉ. रोहित काळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
– डॉ. पांडुरंग दोडके, उपजिल्हा रुग्णालय, भोर
डॉक्टरसह परिचारकांच्या निलंबनाची मागणी
गर्भवती महिलेच्या प्रसूतीच्या कामात डॉक्टर व परिचारिकांनी हलगर्जीपणा के ला असल्याने नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. यास जबाबदार संबधित कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी भोर पोलिसात मयत नवजात बालकाचे आजोबा पंढरीनाथ कुडले तसेच नातेवाइकांनी तक्रार देऊन केली आहे.





