पुणे जिल्हा : निवडणुकीच्या ड्युटीवर शिक्षकाचा मृत्यू

मोईतील संतोष जोशी यांचे उपचारादरम्यान निधन
राजगुरूनगर – लोकसभेच्या निवडणूक कामी केंद्रावर पोहोचल्यावर संतोष जोशी या शिक्षकाला हृदयाचा झटका आला होता. त्यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना खेड तालुक्यात घडली.संतोष जोशी असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.
खेड तालुक्यातील मोई विद्यालयातील शिक्षक संतोष गणपत जोशी या शिक्षक कर्मचार्यांची हडपसर येथील कोंढवा येथे निवडणूक कामे सर्व साहित्य घेऊन पोहोचल्यानंतर तिथे ते चक्कर येऊन पडले. तेथे निवडणूक आयोगातील अधिका-यांनी नोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पुढील उपचारासाठी क्वार्ड म्हणजे संत ज्ञानेश्वर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी (दि. 15) रात्री साडेअकरा वाजता या शिक्षकाचे मृत्यू झाला.
नवडणुकीच्या ड्युटीवर असताना संतोष जोशी या शिक्षक कर्मचार्याचा मृत्यू झाला. निवडणूक आयोगाने संबंधित कर्मचार्यास नुकसानभरपाई मिळावी, पुढील निवडणूक कामांमध्ये ज्या शिक्षकांचे वय 55 वर्षापेक्षा अधिक आहे अशा शिक्षक कर्मचार्यांना निवडणूक आयोगाने नेमणूक करण्यात येऊ नये अशी मागणी खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय बोरकर, खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नितीन वरकड, पुणे जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेचे सचिव रामदास रेटवडे, मुख्याध्यापक शेख यांनी शिक्षण विभाग व निवडणूक आयोगाकडे केली आहे.
संतोष जोशी यांचा ड्युटी करत असताना मृत्यू झाला आहे. त्यांना आर्थिक मदत मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे यासाठी गटशिक्षण शिक्षण अधिकारी अमोल जंगले याना प्रस्ताव तयार करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत लवकरच हा प्रस्ताव निवडणूक आयोग व संबंधित विभागाकडे पाठविण्यात येईल
– मदन जोगदंड, सह निवडणूक अधिकारी





