Pune District : दौंड पोलिसांना जबर मारहाण

दौंड : दौंड तालुक्यातील आलेगाव, धुमाळ वस्ती येथे पोलिसांना मारहाण करण्यात आल्याची गंभीर घटना घडली. याप्रकरणी दोन जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नजीर गफूरभाई तांबोळी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (दि.12) रोजी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी पोलीस नजीर तांबोळी यांना आलेगाव, धुमाळ वस्ती येथून डायल 112 नंबरवर कॉल आला.
फिर्यादी तांबोळी व सोबत पोलीस कॉन्स्टेबल हे सरकारी वाहनाने गेले होते. तेथे आरोपी कांतीलाल रघुनाथ भोकारे, अशोक रघुनाथ भोकारे (दोघे रा. आलेगाव, धुमाळवस्ती) यांनी पोलिसांना उद्देशून, तुम्ही पोलीस आमच्या घरगुती भांडणात का पडता, असे म्हणून त्यांना अश्लील शिवीगाळ करत तुमची नोकरीच घालवून टाकतो, आम्ही कोण आहे, ते तुम्हाला दाखवतोच अशी शिवीगाळ करून धमकी देऊन त्यांच्या अंगावर धावून आले.
त्यावेळी आरोपी भोकरे याने फिर्यादी नजीर तांबोळी यांना मारहाण केली. आरोपी कांतीलाल रघुनाथ भोकरे याने लोखंडी कोयता घेऊन पोलीस कॉन्स्टेब यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला.





