पुणे जिल्हा : दत्त देवस्थान धार्मिक, अध्यात्मिक स्थान – प्रवीण माने

विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते विणापूजन
इंदापूर – इंदापूर तालुक्यातील व शेजारच्या तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान शहाजीनगर येथील दत्त देवस्थान असून या देवस्थान परिसरात तब्बल 19 वर्षांपासून धार्मिक, अध्यात्मिक, सामाजिक उपक्रमातून भक्तगणांना नागरिकांना शांती प्राप्त होते, असे गौरवोद्गार पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी काढले.
इंदापूर तालुक्यातील शहाजी नगर रेडा येथील दत्त देवस्थान येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह तसेच गुरुचरित्रपारायण सोहळ्याचे विणापूजन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते बुधवारी (दि. 20) पार पडले. यावेळी श्रींची पाद्यपूजा प्रवीण माने यांच्या हस्ते करण्यात आली, त्यावेळीत ते बोलत होते.
टाळ-मृदंग पूजन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मयूरसिंह पाटील यांच्या हस्ते तर औदुंबर पूजा इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णाजी ताटे, डॉ. ओंकारनाथ ताटे यांच्या हस्ते पार पडली. मान्यवरांचे स्वागत दत्त देवस्थानचे प्रमुख तानाजी गायकवाड, नीलकंठ मोहिते यांनी केले. यावेळी रेडा ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच बायडाबाई बाबर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष काशिनाथ देवकर, हमीद अत्तार, पांडुरंग मोहिते, सोमनाथ मोहिते, सतीश साठे, नानासाहेब देवकर, दगडू गायकवाड, काशिनाथ देवकर, महादेव देवकर, आगतराव गायकवाड, सोमेश्वर देवकर,
अभिजीत देवकर, धीरज देवकर, प्रसाद देवकर, दत्तात्रय सोनटक्के, गोविंद गायकवाड, तुकाराम सोनटक्के, आनंद निकम, सोमनाथ ढोले यांच्यासह गलांडवाडी, बावडा, काटी, शहाजीनगर येथील भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कृष्णा ताटे यांनी तर दत्त देवस्थानचे प्रमुख नीलकंठ मोहिते यांनी आभार मानले. माने म्हणाले की, दत्त देवस्थानाला आगामी काळात पाहिजे ती मदत केली जाईल. येथील धार्मिक उपक्रमामुळे नव्या पिढीला संतांचे विचार आत्मसात होत आहेत.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे ऋणानुबंध आपलेपणा जपणारे ज्येष्ठ नेते आहेत. दत्त देवस्थानला विणा पूजनाची परंपरा मोहिते पाटील यांनी जपलेली आहे. इंदापूर व माळशिरस हे दोन्ही तालुके कधीही वेगळे समजले नाहीत.
– मयूरसिंह पाटील, माजी सभापती





