पुणे जिल्हा: इंदापुरात विविध मागण्यांसाठी ‘दंडवत’

इंदापूर – गोरगरिबांच्या विविध मागण्या पूर्ण करावेत या मागणीसाठी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या सामजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सागर मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर शहरातील बाबा चौक ते पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयापर्यंत दंडवत आंदोलन करण्यात आले.
इंदापूर शहरातील बाबा चौक येथे बुधवारी (दि. 10) राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले होते. यावेळी मिसाळ यांनी हातात लिंबाचा पाला व डोक्याला काळी पट्टी बांधून शासनाचा निषेध केला. यावेळी संजय डोनाल्ड शिंदे, विकास खिलारे, श्रीकांत मखरे, अनिल ढावरे, समर सय्यद, बाळासाहेब चितळकर, मनेश जाधव, रायचंद नरळे, अशोक पापत, रोहिदास गेंड, बापूसाहेब जगताप, अजय पारसे, अक्षय कोकाटे, विकास भोसले, मालोजी शेंडगे, संजय दुपारगुडे, सनी बंडगर, विशाल भोसले, संजय गायकवाड, नागेश क्षेत्रीय, अनिल देवकर, नवनाथ चितळकर, गणेश भांडवलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रमाई घरकुल, यशवंत घरकुल, धनगर आवास, मोदी आवास, पंतप्रधान आवास, शबरीआवास ( पारधी व एस टी) अनुदान वाढवावे, या सर्व घरकुल योजनेला पाच ब्रास वाळू मोफत मिळावी.डी. बी. टी च्या योजना त्वरीत चालु कराव्यात. टंचाई, मधुन बोअरवेल तत्काळ मंजुरी मिळावी. हातपंप बंद पडलेले आहेत ते दुरुस्त करून मिळावे. कलाकार व कलावंताच्या अनुदान वाढवावे, एक वर्षांपासून अनुदान बंद आहे. आंतरजातीय विवाह अनुदान वाढवावे यांसह विविध मागण्या करण्यात आल्या आहे.





