पुणे जिल्हा : पवारांच्या बालेकिल्ल्यातच कटकेंची आघाडी

तळेगाव ढमढेरे – शिरूर- हवेली विधानसभेच्या रिंगणात ज्ञायनेश्वर कटके यांनी बाजी मारत विधानसभा गाठली. तब्ब्ल 74 हजारांचे लीड घेत विजय संपादन केला.
तळेगाव ढमढेरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा बालेकिल्ला मानला जात होता. परंतु बालेकिल्ल्यातच खिंडार पडल्याने तळेगाव जिल्हा परिषद गटात महायुतीचे माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके यांना आघाडी मिळाली. यामध्ये धानोरे, विठ्ठलवाडी, शिवतक्रार म्हाळुंगी, कासारी, दहिवडी, पारोडी आदी गावांनी कटकेंची साथ दिली.
शिरूरच्या विधानसभेच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील शरद पवार यांच्याबरोबर राहिलेले एकमेव विद्यमान आमदार अशोक पवार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून कटके यांनी निवडणूक लढवली होती.
यामध्ये ज्ञानेश्वर कटके यांनी बाजी मारली. कटके यांची मतदार संघातील नागरिकांना मोफत उज्जैन यात्रा व महायुतीची लाडकी बहीण योजना कटके यांच्या विजयाचा कौल दिला. तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटात गुलाल, फटाके वाजवून विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.





