पुणे जिल्हा : महिलांचे रक्तदानातील योगदान आदर्शवत – सुनेत्रा पवार

बिरजू मांढरे मित्र परिवारातर्फे शिबिरात 727 बाटल्या संकलन
जळोची – महिलांसाठी आतापर्यंत केलेल्या कार्याची पावती मिळाली, रक्तदान शिबिरात महिलांनी पुढे होऊन केलेले रक्तदान प्रत्येक घटकासाठी महत्त्वपूर्ण, आदर्श व प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन बारामती हाय टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी केले.
सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामती नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांनी साईच्या सेवा ट्रस्टच्या वतीने (दि.16) येथील चिराग गार्डन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी पवार मार्गदर्शन करीत होत्या. शिबिरात तब्बल 727 बाटल्या रक्तदान करण्यात आले.
यावेळी बारामती नगरपरिषदचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष जय पाटील, राष्ट्रवादी पुणे जिल्हा सरचिटणीस प्रा. अजिनाथ चौधर, माजी नगरध्यक्षा भारती मुथा, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर, अभिजित जाधव, माजी नगरसेवक सुधीर पानसरे, अभिजित चव्हाण व किशोर मासाळ, भाग्यश्री धायगुडे, सीमा चव्हाण, अंजली संगई, शुभम ठोंबरे, ऋषी देवकाते, गणेश शिंदे, तुषार लोखंडे, डॉ. सौरभ मुथा,
ऍड. अमर महाडिक, नितीन लोखंडे, जांब ग्रामपंचायतचे सरपंच समाधान गायकवाड, सपकळवाडीचे सरपंच तानाजी सोनवणे, मातंग एकता आंदोलनचे विनोद लोखंडे, आरपीआयचे सुनील शिंदे उपस्थित होते.
बारामतीमध्ये रक्तदान ही चळवळ होत असताना माझ्या वाढदिवसानिमित्त हे रक्तदान शिबीर आहे म्हणून अनेक महिला- पुरुषांच्या बरोबरीने पुढे होऊन आवर्जून रक्तदान करतात ही सामाजिक बदल दर्शवणारी गोष्ट असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. शिबिरासाठी बिरजू भैय्या मांढरे मित्र परिवाराने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सावळे पाटील यांनी केले.
अपघात, ऑपरेशन व इतरवेळी रुग्णांना रक्ताचे तातडीने आवश्यकता असते. ही गरज विचारात घेत व सामाजिक भान जपत सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याचे आयोजक बिरजू मांढरे यांनी सांगितले.





