पुणे जिल्हा : पवार कुटुंबीयाचे सर्व घटकांत योगदान

डॉ. पंकज गावडे महाराज : जातेगावात सुंदराबाई पवार यांच्या प्रथम स्मृतीदिनी उपक्रम
पाबळ – आईच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त समाज सुदृढ करण्यासाठी उत्तमोत्तम समाज प्रबोधकांचे विचार समाजाला आमंत्रित करून त्यांच्यासमोर ठेवायचे, हा सुंदर विचार उद्योगपती सदाशिव पवार, बंधू प्रकाश पवार, सुरेश पवार आणि केशरताई पवार आणि मीनाताई साकोरे यांसह पवार कुटुंबीयाचा आहे.
सामाजिक, शिक्षण, व्यवसाय, राजकीय क्षेत्रात समाजकार्यात मोठा सहभाग आहे, असे प्रतिपादन मानसशास्त्राचे अभ्यासक डॉ. पंकज गावडे महाराज यांनी केले. यावेळी पंकज महाराज यांनी पवार कुटुंबीयांच्या सामाजिक, शैक्षणिक, उद्योग व सामाजिक जबाबदारीच्या सहभागाबाबत कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले.
शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक येथील आदर्शमाता कै. सुंदराबाई पवार यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हभप डॉ. पंकज गावडे यांचे बोधपर कीर्तन व प्रवचन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिरूर तालुक्यातील आपल्या कार्य व कर्तृत्वाचा सामाजिक क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला. यावेळी माजी मंत्री, आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे माजी आयुक्त कांतीलाल उमाप, कात्रज दूध संघाच्या माजी अध्यक्षा केशरताई पवार, माजी सरपंच मीनाताई साकोरे, पुणे बाजार समितीचे माजी सभापती पंढरीनाथ पठारे, भीमाशंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, संचालक प्रदीप वळसे पाटील, शिरूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
गौरव सोहळ्याचे मानकरी
यावेळी दत्तात्रय बबनराव वारे गुरुजी, सुंदरबाई पवार स्मृती गौरव जातेगाव भूषण पुरस्कार2024, सुवर्णा विश्वास साकोरे केंदूर, महिला उन्नती पुरस्कार, तुषार भैरवनाथ काळे वरुडे आदर्श उद्योगपती, कै. अतुल सदाशिव पवार उद्योगरत्न पुरस्कार, राजीव वसंतराव फराटे, मांडवगण फराटे कै बाबासाहेब पवार स्मृती गौरव उत्कृष्ट संस्थाचालक पुरस्कार, दीपक खैरे हिवरे, सुंदरबाई पवार स्मृती गौरव विशेष ग्रामविकास पुरस्कार, प्रा. रामदास थिटे, जातेगाव, कै अतुल सदाशिव पवार उत्कृष्ट शिक्षणसेवा पुरस्कार, प्रा. अनिल तुकाराम साकोरे, उद्योगपती कै अतुल सदाशिव पवार उत्कृष्ट शिक्षणसेवा पुरस्कार,
सोमनाथ बबनराव भंडारे, वढू बुद्रुक, कै अतुल सदाशिव पवार उत्कृष्ट शिक्षणसेवा पुरस्कार, दीपक जयसिंग भिवरे, खराडी, अतुल सदाशिव पवार उद्योगरत्न पुरस्कार, ज्ञानेश्वर मंडलिक, अतुल सदाशिव पवार, सामाजिक सेवा पुरस्कार 24, रुपेश बेंद्रे, अतुल सदाशिव पवार उद्योगरत्न पुरस्कार, डॉ. मिलिंद भोसुरे, (स्व) सुंदरबाई पवार अध्यात्म सेवा पुरस्कार, सोपानराव नवले, (स्व) बाबासाहेब पवार सामाजिक सेवारत्न पुरस्कार, बबनराव जाधव, बाबासाहेब पवार सामाजिक सेवा पुरस्काराने गौरविले.





