पुणे जिल्हा : मुळशी तालुक्यात पौड येथे संविधान दिन साजरा

नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांचे संविधान स्तंभाला अभिवादन
पौड – मुळशी तालुक्यात संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान स्तंभाला अभिवादन करण्यात आले.
संविधान प्रतीचे वाचन करून उपस्थितांना शपथ देण्यात आली. यानंतर मुळशी पंचायत समितीच्यावतीने गट विकास अधिकारी सुधीर भागवत यांस कडून नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर संविधान गटविकास अधिकारी सुधीर भागवत, अंकुश मोरे, अमित कंधारे, भिकोबा ओहाळ, श्रीकांत कदम, माऊली कांबळे, संजय सातव, गोविंद निकाळजे, दशरथ गायकवाड, विजय भोसले, योगेश ओव्हाळ, विशाल शेळके, भाऊसाहेब केदारी, उज्वला पिंगळे, किरण ढोरे, विजय भालेराव, निलेश आल्हाट, आनंद रोकडे, प्रदीप उबाळे, जालिंदर गुरव, बाळासाहेब इप्ते, विपूल गुजराथी, संतोष ढोरे, प्रशांत रानवडे, सुनिल वाडकर, प्रकाश वाघ, अशोक कांबळे तसेच पंचायत समितीचे कर्मचारी उपस्थित होते.





