पुणे जिल्हा : आमदार बेनकेंच्या प्रयत्नातून ओतूर शाळेला संगणक

ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील जिल्हा परिषद शाळा नंबर 1 या शाळेला आमदार अतुल बेनके यांनी आश्वासनपूर्ती करत 10 संगणकसंच भेट म्हणून दिले.रोटरी क्लब चाकणचे अध्यक्ष डॉ.अमोल बेनके यांच्या प्रयत्नातून हे संगणक संच देण्यात आले.
या संगणक कक्षाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओतूरच्या सरपंच प्रा. डॉ. छाया तांबे होत्या. ईशस्तवन स्वागत गीत आणि लेझीमच्या गजरात पाहुण्याचे स्वागत करण्यात आले. लेझीमच्या तालबद्ध प्रात्यक्षिकाचे उपस्थितांनी कौतुक केले.
डॉ.अमोल बेनके, युवा नेते अमित बेनके, रोटरी क्लब ऑफ चाकणचे सचिव चंद्रकांत हिवरकर, डॉ. देवीराज पाटील, डॉ.राहुल महाजन या मान्यवरांच्या हस्ते संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे माजी सभापती विशाल तांबे, उपसरपंच प्रशांत डुंबरे, जयप्रकाश डुंबरे, गंगाराम डुंबरे, विनायक तांबे, संतोष तांबे, जयवंत डुंबरे, अनुराग फापाळे,
दयानंद डुंबरे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व माता पालक गट सदस्य उपस्थित होते. शालेय भौतिक सुविधा आणि गुणवत्तेविषयी मान्यवरांनी कौतुक केले तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका लीला धिरडे यांनी सूत्रसंचालन राजेंद्र आरोटे यांनी तर शिक्षकांनी परिश्रम घेतले.





