अग्निशमक बंबातील पाण्याच्या सहाय्याने स्तंभ धुवून स्वच्छ शिक्रापूर – कोरेगाव भीमा (ता. शिरूर) सह पेरणे (ता. हवेली) येथे १ जानेवारी शौर्यदिनी ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना देण्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनाची तयारी जोरात सुरू झाली आहे. विजय रणस्तंभ पाण्याने धुवून घेत या सजावटीची सुरुवात करण्यात आली आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे ता. हवेली येथील ऐतिहासिक विजय स्तंभास १ जानेवारी शौर्यदिनी होणाऱ्या मानवंदना कार्यक्रमा दरम्यान मोठ्या प्रमाणात सजावट करण्यात येते. येथे असलेला ७५ फुटी ऐतिहासिक विजय रणस्तंभ कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फुलांसह विद्युत रोषणाईने आकर्षक पद्धतीने सजविण्यात येत आहे. शौर्यदिनाच्या कार्यक्रमास अवघे दोन-तीन दिवस उरले असताना आता येथील विजयस्तंभाच्या सजावटीची तयारी सुररू करण्यात आली असून, पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या वतीने पुणे महानगर विकास प्राधिकरणच्या अग्निशामक दलाचे अधिकारी विजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमक बंबाच्या पाण्याच्या सहाय्याने स्तंभ धुवून स्वच्छ करत सटावटीच्या तयारीस सुरवात करण्यात आली आहे. यावेळी बोलताना लवकरात लवकर सर्व कामे मार्गी लावून सजावटीसाठी तयारी करण्यात येणार असून, या वर्षी विजयस्तंभ फुलांनी सजवत स्तंभ परिसरात आकर्षक सजावट करण्यात येणार असल्याचे कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व जिल्हा उपाध्यक्ष दीपिका भालेराव यांनी सांगितले आहे.