पुणे जिल्हा : केसनंद येथे स्वच्छता सप्ताह संपन्न

सरपंच प्रमोद हरगुडे यांची संकल्पना
वाघोली : करूया श्रमदान गावासाठी, स्वच्छ सुंदर केसनंद बनविण्यासाठी या संकल्पनेतून केसनंद तालुका हवेली येथील ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच प्रमोद हरगुडे यांच्या संकल्पनेतून 24 जून ते 29 जून या कालावधीमध्ये स्वच्छता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये केसनंद गावठाणातून बाहेर पडणारे सर्व सात रस्त्यांवर स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण गाव व परिसर स्वच्छ करण्यात आला.
यामध्ये अदर पूनावाला ग्रुप, ऑफिसर्स करिअर अकॅडमी गावातील सर्व विद्यालय यांचे चांगल्या पद्धतीने सहकार्य लाभले. समाज प्रबोधनकार ह. भ. प. संग्राम बापू भंडारे यांनी सांगता समारंभाच्या निमित्ताने स्वच्छतेच्या जनजागृती विषयी कीर्तन रुपी सेवा करून उपस्थित जनतेला स्वच्छतेचा एक चांगला संदेश दिला.
याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





