पुणे जिल्हा : पांडेश्वरच्या महादेव मंदिराची स्वच्छता
Updated On:

सासवड – अयोध्या येथे आयोजित श्री राम मंदिर उद्घाटन सोहळ्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच पांडवांचे पिता
ज्यांचे प्रथम पितृश्राद्ध ज्या ठिकाणी संपन्न झाले त्या श्रीक्षेत्र पांडेश्वर महादेव मंदिर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी जवळार्जुनचे सरपंच व पुणे जिल्हा पंचायत राज व ग्राम विकास विभागाचे अध्यक्ष सोमनाथ कणसे, काकासाहेब लवांडे, सरपंच पांडेश्वरचे सरपंच पंढरीनाथ सोनवणे, काळुराम राणे, कल्याण साळुंके, पंकज गुळूमकर उपस्थित होते.





