पुणे जिल्हा : करंदीत नागरिकांकडून दिशादर्शक फलकांची स्वच्छता

शिक्रापूर : करंदी (ता. शिरूर) येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या दिशादर्शक फलकांची दुरवस्था झालेली असल्याने नागरिक, वाहन चालकांना रस्त्याची दिशा न समजल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. नाइलाजाने नागरिकांनी दिशादर्शक फलकांची स्वच्छता करत फलक खुले केल्याने युवकांचे परिसरातून कौतुक होत आहे.
करंदी येथे रात्रीच्या सुमारास होणार्या चोर्या रोखण्यासाठी नागरिकांनी रात्रगस्त सुरु केली. गस्त घालत असताना दिशादर्शक फलकांवर झाडे झुडपे वाढून काही ठिकाणी धुळीने फलक झाकले गेल्याने नागरिकांना रस्त्याची दिशा, सुचना तसेच गतिरोधक समजत नसल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाल्याचे लक्षात आल्याने सामाजिक कार्यकर्ते महेश साबळे पाटील, सोमनाथ सोनवणे, चंद्रकांत दरेकर,
शुभम सोनवणे यांनी स्वतः हातामध्ये कुर्हाड व पंप घेत फलकांवरील झुडपे काढून फलक धुऊन स्वच्छ करत फलकांची स्वच्छता करुन सर्व दिशादर्शक फलके खुली केल्याने नागरिकांना व वाहन चालकांना रस्त्याची दिशा व सुचना समजू लागल्या असून गावाच्या रक्षणासाठी रास्तगस्त घालत आदर्श निर्माण करणार्या नागरिकांच्या या कार्याचे परिसरातून कौतुक होत आहे.





