Pune District : संत गोरोबाकाका, नागेश्वर आगमनाने रेडणीमध्ये चैतन्य

इंदापूर –आकर्षक फुलांनी सजविलेल्या रथातून संतश्रेष्ठ गोरोबाकाका आणि नागेश्वर पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे. टाळ, मृदंग, वीणा, पताका, डोक्यावर तुळस घेऊन वारकरी भक्तिभावाने पालखी सोहळ्यात उत्साहात सहभागी झाले आहे. या पालखीचे इंदापूर तालुक्यात जागोजागी स्वागत करण्यात आले असून रेडणीमध्ये पालखी मुक्कामी आल्यानंतर भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण राहिले आहे.
गुंजवणी (ता. राजगड) येथून संत गोरोबाकाका पालखी सोहळ्याचे प्रस्थान झालेल्या दिंडीचे रविवार (दि. 29) रेडणी (ता. इंदापूर) येथे भाविकांनी दर्शन घेतले. यावेळी सरपंच हिराबाई खाडे, उपसरपंच पुष्पा काळकुटे, ग्रामपंचायत अधिकारी महेश म्हेत्रे, हरिभाऊ काळे, मामा चव्हाण, दत्तात्रय तरंगे, सोहळाप्रमुख निवृत्त विस्ताराधिकारी महेश दळवी, भोर तालुका खरेदी संघाचे माजी संचालक, माजी सरपंच सुधीर वाल्हेकर, विलास इगावे, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या अर्चना दळवी,
हातवेचे सरपंच संदेश खराडे, भानुदास जामदार, बाळासाहेब सोंडकर, सदाशिव भिलारे, रमेश कोंडे, रामनाना कोंडे, जगन्नाथ कोंडे, बाजीराव सोंडकर व रेडणीचे ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. पालखीचा रविवार रात्रीचा मुक्कामात वारकर्यांनी सादर केलेल्या भजन कीर्तन प्रवचनांमध्ये भावी रंगले होते. अन्नदानाची सोय ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली.
संतश्रेष्ठ गोरोबाकाका पालखीच्या मागे इतर दोन पालखी सहभागी होत असून दिंडीमध्ये जवळपास दोन हजारहून अधिक वारकरी दरवर्षी सहभागी होत आहे.





