पुणे जिल्हा : राजमाता आहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करा

भोर – पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९९ वी जयंती भोर तालुका सकल धनगर समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली. या वेळी भोर तालुका धनगर समाजाचे व समाजवादी पक्षाचे नेते मारुती गोरे यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होत असताना ती घराघरात साजरी करा, असे आवाहन केले.
या वेळी भोर येथील एसटी बसस्थानकाजवळील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे भोरच्या उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डाँ.पांडुरंग दोडके यांचे हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या वेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष मारुती गोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठलराव गोरे, धनगर समाज नेते राजेश शिंदे, मोरया प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापू ढेबे, डॉ. डफळ, प्रवीण काटकर, ढेहनचे उपसरपंच विठ्ठल शिंदे, म्हसरचे उपसरपंच देविदास गोरे, कोंडगावचे पोलीस पाटील बापू हुंबे, बबनराव गोरे आणि समाजबांधव उपस्थित होते.
महिलांना सती जाण्याच्या रूढी परंपरांना छेद देऊ त्या प्रथा खंडित केल्या याचे श्रेय पुण्य पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जाते, असे मारुती गोरे यांनी सांगितले.





