Pune District: ग्रामीण भागात चाऱ्याविना वासरांची वणवण

मंचर : गोहत्त्या कायदा केल्यापासून शेतकरी गाईला गोऱ्हे झाले की लगेच आडमार्गी रस्त्यावर किंवा गावाच्या बाजूला असलेल्या जंगलात नेऊन सोडून देतात. ग्रामीण भागात चाऱ्याविना वासरांचा प्रश्न जटील उभा राहिला असून वासरांसाठी सरकारने चारा छावण्या उभ्या कराव्यात.अशी मागणी शेतकरी बांधवांसह प्राणीमित्र संघटनांनी केली आहे.
आधुनिक यांत्रिक युगात पारंपारिक पद्धतीने शेती करताना पूर्ण पणे यांत्रिकीकरण वापरले जात आहेत. पूर्वी शेती नांगरणी, पेरणी, खटारगाडी किंवा मोटा ओढण्यासाठी जर्शी बैलांचा वापर केला जात असत आणि गावठी गाईचे गाडा पळवीण्यासाठी पारंपारिक वापर करत आले आहेत. परंतु सद्यस्थितीत कडक उन्हाळा असल्याने वासरांना खाणे तर सोडाच,पाणी पण मिळत नाही. नुकतेच झालेलं वासरू दूध प्यायला असते.
त्यावेळी त्याला आईच्या दुधाची गरज असते. त्याच वेळी त्याला जंगलात बेवारस सोडलं जाते. आता गोहत्त्या कायदा केल्यापासून शेतकरी गाईला गोऱ्हे झाले की लगेच आडमार्गी रस्त्यावर किंवा गावाच्या बाजूला असलेल्या जंगलात नेऊन सोडून देतात.
दिवस भरात जे कोणी रस्त्याने माणस दिसतात. त्यांच्या मागे ही वासरे मोठ्या आशेने हम्बरडा फोडतात आणि मागे मागे चालतात. एखादी गाडी आली की गाडी मागे पण जातात. अशातच मोकाट कुत्र्यांच्या ताब्यात वासरू सापडले की सारे कुत्रे मिळून त्याचे लोचके तोडतात. त्याला जखमी करतात. त्यांना कावळे पण टोचून टोचून वेदना करतात. काही त्यातच गतप्राण होतात.
काही बिबट्याच्या पण तावडीत सापडतात आणि त्यांचा अंत होतो. भटक्या कुत्र्यांना आणि वाघांना जर अशी रोज जर वासरे खाण्याची सवय लागली. तर ते पुढे मागे शेतकऱ्यांच्या गोठ्यावर पण हल्ला करायला मागे पुढे बघणार नाहीत. याची सरकारने दखल घेतली पाहिजे. सरकार गोशाळा उभारतात किंवा त्यावर पण खर्च करतात. तसेच भटक्या वासरांचे जतन करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जे शेतकरी वासर आणून ते जंगलात सोडतात. त्या ऐवजी सरकाने ग्रामीण भागात बेवारस वासरांसाठी पण छावण्या उभ्या करण्यासाठी आणि शेतकर्यांना छावणीत वासर सोडण्यासाठी आवाहन केले पाहिजे.
प्रत्येक गावात बिबट्यांचे प्रमाण खूप वाढत चाललेल आहे. त्यात आता ते माणसांवर पण हल्ले करू लागले आहेत. काही भयंकर गोष्टी पुढे घडण्यागोदरच सरकारने काही पावले उचलून या नवजात वासरांना वाचवलं पाहिजे.
– शामराव टाव्हरे, माजी उपसरपंच, निरगुडसर ग्रामपंचायत.





