पुणे जिल्हा : गवळेश्वरनगरातील पूल वाहून गेला
Updated On:

बेल्हे – जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील मंगरूळ येथील गवळेश्वर नगर येथील पूल वाहून गेला असून दीडशे ते दोनशे फूट रस्त्याचा भराव सुद्धा वाहून गेला आहे.
परिसरातील कांद्याच्या चाळीत पाणी शिरून साठून ठेवलेला कांदा खराब झाला आहे. तर अनेक ठिकाणी विजेचे पूल पडले आहेत.
सतत दोन दिवस झालेल्या ढगफुटीसदृश पावसाने शेतकऱ्यांच प्रचंड नुकसान झाले आहे. तर शेतामध्ये 3 ते 4 फुटापर्यंत पाणी साचले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शासकीय मदतीची मागणी केली आहे.
या पुलाची पाहणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य पांडुरंग पवार, बाळासाहेब खिलारी, जयवंत घोडके, जुन्नर तालुक्याचे शाखा अभियंता यांनी केली.





