पुणे जिल्हा : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, याबाबत काही माहीत नाही
Updated On:

– शरद पवार यांचे मौन
बारामती – राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहेत. याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांना विचारले असता, मला याबाबत काही माहीत नसल्याचे उत्तर त्यांनी दिले.
बारामती येथील गोविंद बाग या आपल्या निवासस्थानी शरद पवार पत्रकारांशी बोलत होते. विविध विषयांवर प्रश्नोत्तर सुरू असताना दोन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा होत असल्याचा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला.
मात्र, याबाबत मला काही माहीत नसल्याचे स्पष्ट उत्तर शरद पवार यांनी दिले. पत्रकारांनी इतर विविध विषयावर विचारलेल्या प्रश्नांना देखील त्यांनी बगल दिली.





