Pune District : भूगावकरांचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन

पिरंगुट- भूगाव (ता. मुळशी) येथील ग्रामस्थांनी गावातील प्रलंबित मागण्यांसाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतली. प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन मंत्री मोहोळ यांना देण्यात आले.
गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेला बाह्यवळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावं अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने ग्रामस्थांबरोबर प्रवाशांना देखील वाहतूककोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वेळोवेळी निवेदने देऊनही हा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी मोहोळ यांना सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी जे. एम. भोंग, जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम इंगवले, पोलीस पाटील संघटनेचे माजी अध्यक्ष कालिदास इंगवले, ज्येष्ठ नेते विलास इंगवले पाटील, भाजपा महाराष्ट्र प्रदेश राज्य परिषद सदस्या वैशाली मनोहर सणस, सरपंच राजेंद्र दबडे, सचिन अमराळे, राहुल इंगवले, मनोहर सणस, उत्तम मिरगे, रुपेश सुर्वे, दत्ता सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. सतत खंडित होणारा वीजपुरवठा, ग्रामपंचायतीच्या सेवांसाठी शासकीय भूखंड उपलब्ध करून देणे बाबत, बाह्यवळण रस्ता आदी बाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे मनोहर सणस यांनी सांगितले.





