पुणे जिल्हा : भोर-राजगड-मुळशीला प्रगतीच्या शिखरावर पोहोचविणार

शंकर मांडेकर ः भोर येथे कार्यकर्ता मेळाव्यात जाहिरनाम्याचे प्रकाशन
भोर – भोर, राजगड, मुळशी तालुक्यांनी माझी उमेदवारी स्वीकारली याचा मला आनंद आहे. मी एक हाडाचा कार्यकर्ता आहे. काम करताना सर्वांना सोबत घेऊनच कामे केली. कामे करताना कधीही मी पक्षपात केला नाही आणि करणार नाही, असे प्रतिपादन महायुतीचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी केले. पुढील पाच वर्षात विविध विकास कामांच्या माध्यमातून भोर-राजगड-मुळशी या तालुक्यांना प्रगतीच्या नव्या शिखरावर पोहोचविणार असल्याचे मांडेकर यांनी यावेळी सांगितले.
भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर मांडेकर यांचा प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा भोर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्यात मांडेकर यांच्या जाहिरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाबूराव चांदेरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, माजी सभापती बाबा कंधारे, कालिदास गोपाळघरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊली साठे, पंकज हरपुडे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे,
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विक्रम खुटवड, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भालचंद्र जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, माजी गटनेते भोर नगरपालिका यशवंत डाळ, राष्ट्रवादी काँग्रेस भोर शहर अध्यक्ष केदार देशपांडे, महिला अध्यक्ष विद्या पांगारे, युवती अध्यक्ष नीलम झांजोळ, माजी परिषद सदस्य भिकू निगडे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अशोक शिवतरे,
शेतकरी सेलचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, विद्यार्थ्यी अध्यक्ष प्रशांत पडवळ, कार्याध्यक्ष भोर विधानसभा भूषण शिवतरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस प्रा. बी. डी. गायकवाड, ओबीसी सेल अध्यक्ष मारुती गोरे, मनोज खोपडे, प्रणव घोडके, मोहन इंदलकर, विष्णू मादगुडे, अतुल काकडे, ऋषी गायकवाड, गणेश निगडे, कार्यकर्ते उपस्थित होते.
जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे
– भोरमध्ये एमआयडीसी उभी करून रोजगार निर्मितीसाठी औद्योगिकीकरणाला चालना देणार
– भोर व राजगड तालुक्यातून कोकणात जाणार्या रस्त्यांना विकसित करणार
– हिंजवडी-माण येथील आयटी पार्कमध्ये स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार
– सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा विकास करून दळणवळण व्यवस्था भक्कम करणार
– शासकीय शाळांची गुणवत्ता सुधारून युवकांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रांची स्थापना करणार
– प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण आरोग्य केंद्रे अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज बनविणार
– राजगड, तोरणा या किल्ल्यांचे संवर्धन व जतन करणार
– निसर्गरम्य पर्यटनस्थळांचा विकास करून रोजगार निर्मितीला चालना देणार
-हिंजवडी, माण, सूस, भूगाव, बावधन या भागातील रस्त्यांचे मजबूतीकरण.





