पुणे जिल्हा : बारामतीत वसंत बागच्या प्लॉटिंगचे भूमिपूजन

प्रशस्त, दर्जेदार सुविधा मिळणार
माळेगाव – प्लॉटिंग क्षेत्रामध्ये संपूर्ण पुणे, सातारा, नगर जिल्ह्यांमध्ये नावाजलेल्या नवजीवन ग्रुपचा बारामती नगरपालिका हद्दीमध्ये इंदापूर रोड पोदार स्कूलच्या पाठीमागे वसंत बाग या नावाने प्लॉटिंगचे भूमिपूजन समारंभ पार पडले.
यावेळी उद्योजक रवींद्र काळे, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक योगेश जगताप, नवजीवन उद्योग समूहाचे चेअरमन शितलआप्पा लोखंडे, नवजीवन उद्योग समूहाचे संचालक कांताभाऊ काळे, जयदीप तावरे, संतोष जाधव, विकास बाबर, हेमंत गरगटे उपस्थित होते. बारामती नगरपालिका हद्दीमध्ये हा प्रकल्प असून आकर्षक असे प्रवेशद्वार असणार आहे.
क्लब हाऊस, जॉगिंग ट्रॅक, 40 व 30 फुटी अंतर्गत डांबरी रस्ते असणार आहेत. सर्व प्लॉटला ड्रेनेज लाइन, स्ट्रीट लाइट, प्रत्येक प्लॉटला पाणी कनेक्शन व वीज कनेक्शन व्यवस्था करण्यात आली आहे. चिल्ड्रन प्ले गार्डन, ओपन पार्टी लॉन्स, ओपन जिम, सुसज्ज असे गार्डन अशा असंख्य सुविधा या ठिकाणी असणार आहेत.
पालखी महामार्गाजवळच असून सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार तयार करण्यात आले आहेत. सुसज्ज रस्ते आणि नागरी सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत, ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची सुविधा, संपूर्ण प्रकल्पाला आकर्षक, असे तार कंपाउंड, रस्त्याच्या कडेने वृक्षारोपण, वेल ब्लीडेबल प्लॉटच्या साईजेस, सोबती हिरवा परिसर, झाडांना ठिबक सिंचन आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती नवजीवन उद्योग समूहाचे चेअरमन शितलआप्पा लोखंडे यांनी दिली.





