पुणे जिल्हा : मोफत उज्जैन दर्शन यात्रेचा लाभ

शिवसेनेचे जिल्हा समन्वयक कटके यांचा उपक्रम
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटातील नागरिकांनसाठी शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर कटके यांनी वाढदिवसानिमित्त मोफत उज्जैन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटातील तीन हजार पाचशेंपेक्षा अधिक भाविक यात्रेत सहभागी झाले होते.
यात्रेमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला ओळखपत्र देण्यापासून रेल्वेतील सुविधा तसेच महाराष्ट्रीयन रुचकर मोफत भोजन देण्यासाठी कटके यांनी अथक प्रयत्न केले. यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक नागरिकांची स्वतः भेट घेत विचारपूस करण्यातही कटके यांनी कसर सोडली नाही. तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटातून झालेल्या उज्जैन यात्रेत महिलांचा मोठा सहभाग होता.
उज्जैनमध्ये दर्शनसाठी आलेल्या भाविकांचे ढोल- ताशाच्या गजरात फुलांची उधळण करीत स्वागत करण्यात आले. ज्ञानेश्वर कटके यांनी याआधीही शिरूर विधानसभा मतदारसंघातून 5 जिल्हा परिषद गटातून मोफत उज्जैन यात्रेचे आयोजन केले होते.
अजून राहिलेल्या सर्व नागरिकांसाठी मोफत उज्जैन यात्रा सुरु राहणार असल्याचे शिवसेना जिल्हा समन्वयक ज्ञानेश्वर कटके यांनी उज्जैन येथील आभार मेळाव्यात सांगितले. कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी कटके यांनी विधानसभा लढवण्याची इच्छा बोलून दाखवली.त्यामुळे कटके जर मैदानात उतरले तर शिरूरच्या रिंगणात महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.





