पुणे जिल्हा : कर्जदाराला 30 ते 35 टक्के सबसिडीचा लाभ

राजगुरूनगर बँकेचे अध्यक्ष अध्यक्ष दिनेश ओसवाल यांची माहिती
पीएमईजीपीत जिल्ह्यात पहिली तर राज्यात तिसर्या क्रमांकावर
राजगुरुनगर – शासनाच्या सुक्ष्म लघु मध्यम उद्योग (एमएसएमई) अंतर्गत पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेतून (पीएमईजीपी) कर्ज पुरवठा करण्यासाठी मान्यता मिळालेली राज्यातील तिसरी आणि पुणे जिल्ह्यातील पहिली नागरी सहकारी बँक म्हणून राजगुरूनगर सहकारी बँक आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 250 कर्ज प्रकरणे झाली आहेत. साडेसात कोटी कर्ज वाटप झाले असून कर्जदाराला 30 ते 35 टक्के सबसिडीचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांनी दिली.
अध्यक्ष दिनेश ओसवाल म्हणाले की, मागील 9 महिन्यांत राजगुरूनगर सहकारी बँकेने 300 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे, यात 200 कोटीच्या ठेवी, 100 कोटीची कर्जे वाटप केली आहेत. आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. तर आतापर्यंत बेकेने 2800 कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार करीत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
2023- 24 मध्ये बँकेचा व्यवसाय 287 कोटींचा झाला होता.एकूण 2500 कोटी व्यवसाय झाला होता. 13 वर्षांनंतर नेट एनपीए प्रमाण शून्य टक्के झाले आहे. हा बँकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, सेवक यांच्या माध्यमातून बँकेची घोडदौड सुरु आहे. यावेळीच्या आर्थिक वर्षाच्या शेवटी ग्रॉस एनपीए सुमारे 7 टक्क्यांच्या आत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दिनेश ओसवाल म्हणाले की, राजगुरुनगर सहकारी बँकेच्या 17 शाखा सुरु आहेत. नवीन शाखांना आरबीआयची लवकरच परवानगी मिळणार आहे.चाकण एमआयडीसी मधील भांबोली, मेदनकरवाडी (चाकण) आणि कुरुळी या भागात बँकेच्या शाखा उघडण्यात येणार आहेत तर कडूस, मंचर, आळेफाटा, जुन्नर, पाईट, पाबळ आणि भोसरी या सात शाखांच्या इमारती स्वमालकीच्या करण्याचे प्रयत्न आहेत. 2022-2023 चा लाभांश सभासदांना 7 टक्के दराने वाटप केला आहे. 2023-2024 चा लाभांश 10 टक्क्यांपर्यंत आरबीआयच्या परवानगीने वाटप केले जाणार आहे.
ठळक बाबी
चालू आर्थिक वर्षात तब्बल 253 चारचाकी वाहनासाठी 35 कोटीचे कर्ज वाटप
कर्मचार्यांसाठी योग प्रशिक्षण आणि विविध वैचारिक व्याख्यानाचे आयोजन
शेतीसाठी (जमीन सपाटीकरण, पाईप लाईन, विहीर खोदाई, ट्रॅक्टर कृषी पंप, मळणी यंत्रासाठी कर्ज पुरवठा)
सभासदांसाठी 2 लाखांचाअपघाती विमा
श्रीराम आवर्त तेहव योजना सुरू
लाडकी बहीण योजनेत 8500 महिलांनी बँकेत खाती उघडली
बँक कर्मचार्याच्या वेतनात 8 ते 13 टक्के वाढ वेतन करार
कर्जदारांना त्यांनी घेतलेल्या रकमेइतके विमा संरक्षण योजना लागू
तब्बल 11 वर्षानंतर शून्य टक्के एनपीए चा पुरस्कार





