पुणे जिल्हा : सुखदुःखात असणार्यांची जाण ठेवा

सरपंच सोमनाथ मोहिते यांचे कार्य कौतुकास्पद -आमदार भरणे
इंदापूर – काटी गावात परिपक्व रस्ते होते का, गावागावाला जोडणारे रस्ते होते का, शासनाच्या विकासाच्या योजना गावापर्यंत पोहोचल्या कोणी व आपल्या सुख दुःखात कोणी मदत केली. याची जाण जनतेने कायमस्वरूपी ठेवली पाहिजे. गावचे सरपंच सोमनाथ मोहिते यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी काढले.
इंदापूर तालुक्यातील काटी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच सोमनाथ मोहिते यांच्या कल्पनेतून व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखालीबारा बसेसमध्ये सहाशे महिला सहलीसाठी रविवारी (दि. 1) रवाना झाल्या. यावेळी उपस्थित महिलांना आमदार दत्तात्रय भरणे मार्गदर्शन करीत होते. ग्रामपंचायत काटीच्या माध्यमातून गावातील महिला भगिनींसाठी अतिशय चांगला उपक्रम राबवला असून, खरे तर जगात कोणीही सुखी नाही. संघर्षमय जीवनात कुठेतरी महिला भगिनी, माता भगिनी यांना वेगळा आनंद घेता यावा. देवदर्शन घेता यावे यासाठी, बारामती कृषी विज्ञान केंद्र त्याचबरोबर महिला बचत गटांना भेटी देऊन, देव दर्शन अशा पद्धतीचे एक दिवसाचा उपक्रम आनंददायी ठरेल. अशी अपेक्षा आमदार दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केली.
घरच्या लेकीने आणि सुनेने आई शब्दातली ताकद कायमस्वरूपी ओळखावी. आपल्या घरात आनंदी वातावरण ठेवण्यासाठी आई, वडील मदत करत असतात यांना विसरू नका. जो महिला भगिनींसाठी गावात उपक्रम राबवला जात आहे. या सहलीच्या उपक्रमाचा आदर्श, इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी ग्रामपंचायतसह प्रत्येक गावाने घ्यावा. असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले. गावच्या विकासासाठी जो निधी लागेल तो निधी भरभरून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यामुळे गावातील कोणत्याही घटकाने चिंता करण्याची गरज नाही.
यावेळी काटी ग्रामपंचायत सरपंच सोमनाथ मोहिते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्रीमंत ढोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते साहेबराव मोहिते, इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुलराव झगडे, सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस अधीक्षक दिनकर मोहिते, रेखा मरगळ, प्रकाश राऊत, डॉक्टर अमोल गोरे, संतोष मोहिते, तुकाराम मोहिते, संजय परांडे, रोहिदास मोहिते, राहुल मोहिते मारुती बाशिंगे, मल्हारी शिंदे, महादेव मोहिते, शरद बोराटे, रणजीत बोराटे, लखन परांडे, शिवाजी माने, विकास भोसले, आजिनाथ भोसले, महादेव मासाळ, विठ्ठल मरगळ, प्रकाश भोसले, व भरतवाडी फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी काटी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





