पुणे जिल्हा : बारामती वकील संघटनेतर्फे न्यायालयात लाडू वाटप
Updated On:

बारामती – अयोध्या येथील श्रीराम प्राणप्रतिष्ठाच्या पार्श्वभूमीवर बारामती येथील कोर्ट परिसरात भाजपचे अॅड. नितान भामे यांच्या सहकार्याने बारामती वकील संघटनेतर्फे न्यायालयात लाडू वाटप करण्यात आले.
श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण बारामती शहर तालुक्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बारामती न्यायालय परिसरात देखील लाडूचे वाटप करण्यात आले.
यावेळी बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. उमेश काळे, माजी अध्यक्ष अॅड. बी. डी. कोकरे, अॅड. अरविंद गायकवाड, अॅड. संजय जगताप, अॅड. अमर काळे, अॅड. जितेंद्र गेडाम, अॅड. ज्ञानेश्वर पिसे, अॅड. ज्ञानेश्वर माने व इतर वकील सदस्य उपस्थित होते.





