पुणे जिल्हा : बारामती शहर वृत्तपत्र विक्रेत्रा संघटनेतर्फे वारकऱ्यांना चहा वाटप

बारामती – बारामती शहर वृत्तपत्र विक्रेत्रा संघटनेच्या वतीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चहा बिस्कीट वाटप हा उपक्रम राबविण्यात आला.
बारामती शहरात संत तुकाराम महाराज याचा पालखी सोहळा विसावला .पालखी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती शहरात ठिकठिकाणी वारकरी अल्पोहार, चहा बिस्किट भोजनाचा आस्वाद घेत होते वृत्तपत्र विक्रेत्रा संघटनेच्या वतीने इंदापूर चौकात वारकरी भाविंकासाठी चहा बिस्कीट वाटप करण्यात आले.
यावेळीवृत्तपत्र संघटनेचे विजय सणस, फैय्याज शेख, राजेंद्र हगवणे ,शामराव राऊत , आप्पा घुमटकर, प्रभाकर लांडगे,रमेश दूधाळ,संतराम घुमटकर , युवराज घुमटकर , सुरज चव्हाण, अनिकेत धालपे, कुमार घाडगे, पांडुरंग हगवणे , दत्तात्रय कुंभार,पोपट म्हेत्रे , बापू गायकवाड ,प्रकाश उबाळे गणेश शिर्के रमेश शिंदे प्रकाश शिंदे गणेश शेळके भोलेनाथ धाईजे आदी वृतपत्र विक्रेते बांधव उपस्थित होते.





