पुणे जिल्हा बँकेच्या कायदेशीर सल्लागारपदी अॅड. कुंजीर
Updated On:

वाघापूर : पुरंदर तालुक्यातील वाघापूर येथील अॅड. राकेश पोपट कुंजीर यांची सहकारी क्षेत्रात अग्रगण्य असणार्या व आशिया खंडातील क्रमांक 1 ची सहकारी बँक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कायदेशीर सल्लागारपदी तीन वर्षाच्या कालावधीसाठी नेमणूक करण्यात आली.
या नेमणुकीचे पत्र पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई व इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. अॅड. राकेश कुंजीर यांच्या नियुक्ती बद्दल सासवड बार असोसिएशन व पंचक्रोशीतून त्यांचे अभिनंदन होत आहे.





