Pune Distric: पौड येथे होणार बेवारस वाहनांचा लिलाव

पौड : पौड (ता. मुळशी) पोलीस स्टेशन ठाण्यात 46 बेवारस वाहने गेली अनेक वर्षे पडून आहेत. ज्यांची ही वाहने असतील त्यांनी आपली कागदपत्रे दाखवून दोन एप्रिलपर्यंत घेऊन जावीत, असे आवाहन पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी केले आहे.
पौड पोलीस स्टेशन येथे रेकॉर्डवरील 46 बेवारस वाहने बरेच दिवसांपासून उभी असून ती गंजून खराब झालेल्या अवस्थेत आहेत. सर्व नागरिकांना पौड पोलीस स्टेशनकडून आवाहन करण्यात येते की, बेवारस वाहनांपैकी जर कोणाची वाहने असल्यास त्या मालकांनी वाहनांचे कागदपत्रासह पौड पोलीस स्टेशन येथे 2 एप्रिल 2025 रोजी पूर्वी संपर्क साधावा.
अन्यथा या बेवारस वाहनांचा जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय पुणे (गृह शाखा) पुणे यांच्या आदेशान्वये पौड पोलीस स्टेशन येथे 3 एप्रिल रोजी सकाळी 11.00 वाजता स्कॅप्र लिलाव केला जाणार आहे.
तसेच ही वाहने खरेदी करण्यासाठी इच्छुक असणार्या स्कॅप दुकानदार यांनी 1 एप्रिल 2025 रोजी आपल्या स्कॅप दुकानाची व आधारकार्डची माहितीचा अर्ज पौड पोलीस स्टेशन येथे रक्कम रूपये 10 हजार अनामत रकमेसह दाखल करावे, असेही आवाहन संतोष गिरीगोसावी यांनी केली आहे.





