Pune District : …अन् कॉन्ट्रॅक्ट म्हटले की लगेच घेता

उपमुख्यमंत्री अजित पवाराम्चा बिल्डरांना मिश्किल टोमणा
बारामती – बिल्डर असोसिएशन कुठली मदत केली आहे का? एखादा रस्ता आहे त्याचा मेंटेनन्स आम्ही बघू असे कधी म्हटले आहे का? कॉन्ट्रॅक्ट म्हटले की लगेच घेता, असा मुश्किल टोमणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिल्डर असोसिएशनला लगावला.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया बारामती शाखेचा पदग्रहण समारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून साहिल खत्री उपाध्यक्षपदी सुभाष धिमान, सचिवपदी आदेश वडूजकर, सहसचिव जितेंद्र जाधव खजिनदार डी. एस. ननवरे यांचा पवार यांच्या हस्ते पदभार देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आनंद गुप्ता, महाराष्ट्रचे स्टेट चेअरमन जगन्नाथ जाधव, माजी स्टेट चेअरमन मनोज पोतेकर उपस्थित होते. अजित पवार म्हणाले की, तुकडा बंदी कायदा रद्द केला आहे त्याचा बांधकाम व्यवसाय करण्यात देखील फायदा होईल. बांधकाम व्यवसायिक महाराष्ट्राचा कणा आहे. जशी व्हीआयपी घरांची निर्मिती करतात तसेच सर्वसामान्यांना परवडेल असे वन बीएचकेची घरे देखील बंधा.
मुंबईतला एक भाग आहे नाव घेत नाही मी त्याचे पण दोन महिन्याचा सात आठ मजले ते चढवायचे आणि ते निघून जायचे आणि ती बिल्डिंग पडायची त्यामुळे आम्ही कायदे केलेत. ग्राहकांच्या दृष्टीने हा कायदा आणला असल्याचे अजित पवार म्हणाले. जसे कायदे केले आहे तसे आम्ही बदलू पण शकतो फक्त तशा सूचना करा, असे त्यांनी नमूद केले.





