प्रवाशांना करत मारहाण मोटरसायकल दिली पेटवून नीरा : पुरंदर तालुक्यातील नीरा येथे एकाने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला असून केवळ आपली गावात दहशत निर्माण व्हावी म्हणून सातार्याहून बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी या आपल्या गावी जात असलेल्या बापलेकाला त्याने मारहाण केली आहे. त्याचबरोबर भर चौकात त्याची मोटरसायकल आणून ती पेटवून दिली आहे. यामध्ये बारामती तालुक्यातील खंडोबाच्या वाडीत राहणारा सचिन कोरडे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, आरोपीला पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून अटक केली आहे. अक्षय शेवाळे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर सचिन कोरडे यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी (दि. 19) कोरडे हे आजारी वडिलांना सातार्यातील शेंद्रे येथून एका ट्रकमध्ये बसून ते त्या ट्रक बरोबर नीरापर्यंत मोटारसायकलवर आले. नीरा येथे रात्री साडेदहाच्या दरम्यान वडिलांना ट्रकमधून उतरवत असताना आरोपी अक्षयने त्यांना विनाकारण मारहाण केली. त्याच्या हातातील धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यामध्ये मारहाण केली. गावगुंडाच्या हातामध्ये हत्यार असल्याने कोरडे त्यांनी तेथून पळ काढला. यानंतर त्या गावगुंडाने त्याच्या वडिलांना सुद्धा मारहाण केली आणि सचिन कोरडे यांची मोटरसायकल छत्रपती शिवाजी चौकामध्ये आणून ती पेटवून दिली. सचिन कोरडे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती उत्तम आहे. दरम्यान, गुन्हा दखल झाल्यानंतर नीरा पोलिसांनी आरोपी अक्षय शेवाळे याला सायंकाळी सातारा जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे व पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप मदने आणि पोलीस नाईक हरिश्चंद्र करे हे करीत आहेत.