पुणे जिल्हा | गुजर प्रशालेतील आल्हाटांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

तळेगाव ढमढेरे, (वार्ताहर)- तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी. गुजर प्रशालेतील कर्मचारी विलास भिकोबा आल्हाट यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. आल्हाट यांनी 29 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्ती घेतली आहे.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे मानद सचिव अरविंद ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अनिल भुजबळ, तळेगावच्या सरपंच अंकिता भुजबळ, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, संचालक परेश सातपुते, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सुधीर ढमढेरे, माजी उपसरपंच राहुल भुजबळ, नवनाथ ढमढेरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष ढमढेरे, सुरेश भुजबळ, मनोज आल्हाट, उद्योजक राहुल करपे, मंदार पवार, बापू अवचर, अमित शेलार,
डॉ. चंद्रकांत केदारी, आरपीआय शिरूरचे अध्यक्ष नवनाथ कांबळे, महाराष्ट्र पश्चिम आरपीआय अध्यक्ष निलेश आल्हाट, प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्यध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांनी व्याख्यानात आधुनिकतेकडे वाटचाल करीत असताना मोबाइलचा अतिवापर कसा टाळावा व आपल्या कुटुंबाचे महत्त्व याविषयीं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रशालेच्या उपशिक्षिका हर्षदा परदेशी यांनी केले. आभार निलेश आल्हाट यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन सिद्धार्थ विकास मंडळ व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मनोज आल्हाट यांनी केले होते.





