पुणे जिल्हा : आळंदीत अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता

आळंदी : कालभैरवनाथ जन्माष्टमीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली. हभप आदिनाथ महाराज लाड यांच्या काल्याचे कीर्तन च्या कीर्तनाने सांगता झाली.
गावकरी भजनी मंडळ तसेच पुजारी मंडळी पंडित रानवडे,भानुदास महाराज,उभे महाराज, सुरेश महाराज दळवी, उकलकर महाराज, महेश कुऱ्हाडे,विशाल महाराज रानवडे, शंकरराव कुऱ्हाडे, सुरेश दौंडकर, महादेव पाखरे,रोहिदास कदम,दिनेश कुऱ्हाडे, विकी गुटे आदी उपस्थित होते.
काल्याचा महाप्रसाद शिवसेना आळंदी शहरप्रमुख (शिवसेना शिंदे गट) राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या सप्ताहासाठी सुरेश वाघमारे, योगेश वाघमारे, ज्ञानेश्वर भैय्या वाघमारे, ज्ञानेश्वर वाघमारे आदींनी परिश्रम घेतले. उपस्थितांमध्ये शिवसेना आळंदी शहरप्रमुख राहुल चव्हाण, उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर घुंडरे, शाखाप्रमुख रोहिदास कदम, विठ्ठल मुऱ्हेकर, अॅड. नाजीम शेख, राजेश्वर पाम्पाटवार आदी उपस्थित होते.





