Pune District : अजित पवार यांचा जिल्ह्यात विविध उपक्रमांनी वाढदिवस साजरा

जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांची माहिती
इंदापूर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस सेवाभावी, सामाजीक व शेतकरी हिताचे उपक्रमांनी पुणे जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
यामध्ये जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शालोपयोगी वस्तू व शैक्षणीक साहित्य वाटप, पावसाळी छत्र्या वाटप, आदिवासी आश्रम शाळांना शैक्षणीक साहित्य वाटप, मोफत आरोग्य शिबीर, जिल्हा परिषद शाळांना वह्या व खाऊ वाटप, नोकरी महोत्सव, भजनी मंडळाला साहित्य वाटप प्रत्येक तालुक्यात करण्यात आले.
शेतकर्यांसाठी 50 टक्के सवलतीच्या दरात औषध फवारणी बॅटरी पंप व मिल्कींग मशीन वाटप, आरोग्य तपासणी शिबिरात कॅन्सर तपासणी, ज्येष्ठ महिला होम मिनिस्टर खेळ पैठणीचा आयोजन, देशी गायींसाठी चारा वाटप, महिला सक्षमीकरण्र मेळावा, शासन आपल्या दारी उपक्रम, युवा संकल्प शिबिर पार पडले.
जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून विविध विकासकामांचे उद्घाटन, वृक्षदिंडी व वृक्षारोपण अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.





