नीलकंठेश्वर पॅनलची आघाडी : सहकार बचाव पॅनलची एक जागेवर आघाडी बारामती – माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असतानाच पहिल्या फेरीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलने आघाडी घेतल्याचे दिसून आले. सायंकाळपर्यंत निळकंठेश्वर पॅनलच्या आठ तर सहकार बचाव पॅनलचे एका जागेवर आघाडी राहिली. संपूर्ण निकाल हाती येण्यासाठी पहाट उजडेल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने यांनी दिली. पहिली फेरी साधारणत; दहा वाजेपर्यंत संपून दुसऱ्या फेरीला सुरुवात होईल, असेही त्यांनी सांगितले. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले आहे त्यामुळे निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. एकूण ३४ टेबलवर मतमोजणी सुरू आहे. ६७ मतदान केंद्रांवरील मतपेट्यातील मतपत्रिकांचे मोजमाप करण्यासाठी दोन फेऱ्या होणार आहेत. पहिल्या फेरीत सायंकाळी सहा वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार नीलकंठेश्वर पॅनलने आघाडी घेतल्याचे दिसून आले. सुरुवातीलाच ब वर्ग प्रवर्गातील मतांची मोजणी झाली त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दणदणीत विजय झाला. १०१ पैकी त्यांनी ९१ मते मिळवली. त्यांचे प्रतिस्पर्धी भालचंद्र देवकाते यांना १० मते मिळाली. त्यानंतर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गा, इथेच इतर मागास प्रवर्ग, भटक्या जमाती प्रवर्ग व महिला प्रतिनिधी प्रवर्गातील मतमोजणी झाली. महिला प्रतिनिधी प्रवर्गात चुरस पहावयास मिळाली. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनलची सरशी होत असल्याचे मतमोजणी सुरू झाल्यानंतर दिसून आले. मतमोजणी सुरू असलेल्या आठ जागांपैकी सात जागांवर अजित पवार यांच्या पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. माळेगाव गटातून निळकंठेश्वर पॅनलचे तीनही उमेदवार आघाडीवर आहेत. यामध्ये निळकंठेश्वर पॅनलचे अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून रतनकुमार भोसले, इतर मागास प्रवर्गातून नितीन शेंडे, भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून विलास देवकाते, महिला प्रवर्गातून संगीता कोकरे यांनी आघाडी कायम राखली आहे. माळेगाव गटातून बाळासाहेब तावरे, शिवराज जाधवराव, राजेंद्र बुरंगले हे आघाडीवर आहेत. तर पणदरे गटातून योगेश जगताप, तानाजी कोकरे, स्वप्नील जगताप हे आघाडीवर आहेत. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणी सध्या बारामती येथील प्रशासकीय भवनात सुरू आहे. यामध्ये निळकंठेश्वर पॅनलचे अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून रतनकुमार भोसले, इतर मागास प्रवर्गातून नितीन शेंडे, भटक्या विमुक्त जाती-जमाती प्रवर्गातून विलास देवकाते, महिला प्रवर्गातून संगीता कोकरे यांनी आघाडी कायम राखली आहे. तर माळेगाव गटातून बाळासाहेब तावरे, शिवराज जाधवराव, राजेंद्र बुरुंगले हे उमेदवार आघाडीवर आहेत. तर सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख रंजनकुमार तावरे, संग्राम काटे, रमेश गोफणे हे उमेदवार पिछाडीवर आहेत. सद्यस्थितीत मोजणी सुरू असलेल्या आठ जागांपैकी सात जागांवर निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे या अवघ्या काही मतांनी आघाडीवर आहेत. दुसरीकडे सहकार बचावचे प्रमुख नेते रंजनकुमार तावरे हेही पिछाडीवर आहेत. त्यामुळे माळेगावच्या निवडणुकीत अजित पवार यांची सरशी होताना दिसत आहे. मतमोजणी प्रक्रिया (संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पहिली फेरी) अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग 8316 मोजलेली बापूराव गायकवाड- 3,717 (सहकार बचाव ) रतन भोसले- 4,117 (निळकंठेश्वर पॅनल) इतर मागास प्रवर्ग 8,353 एकूण रामचंद्र नाळे- 3,644 (सहकार बचाव ) नितीन शेंडे- 4,120 (निळकंठेश्वर पॅनल) भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग 8,274 विलास देवकाते- 4,269 (निळकंठेश्वर पॅनल ) सूर्याजी देवकाते- 3,288 ( सहकार बचाव ) महिला राखीव 8,599 राजश्री कोकरे- 2,022 (सहकार बचाव ) संगीता कोकरे – 2,161 (निळकंठेश्वर पॅनल) मुलमुले ज्योती- 1,959 (निळकंठेश्वर पॅनल) सुमन गावडे- 1,545 (सहकार बचाव ) कडेकोट पोलीस बंदोबस्त शहरातील प्रशासकीय येथे सुरू असलेल्या मतमोजणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माळेगाव कारखान्याच्या चुरशीच्या निवडणुकीत निकालादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली होती. त्यामुळे प्रशासकीय भवनास छावणीचे स्वरूप आले होते. अधिकाऱ्यांसह जवळपास २०० हून अधिक पोलीस कर्मचारी कार्यरत होते.