पुणे जिल्हा : वीसगाव खोर्यातील शेती ओलिताखाली आणणार

गावभेट दौर्यात आमदार संग्राम थोपटे यांची ग्वाही : मतदारांशी संवाद
भोर : भोर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी सर्वदूर पोहचवली असून, त्यांच्या विकासकामांचे मंदिरावर कळस चढविण्याचे काम मागील तीन पंचवार्षिक मध्ये जनतेच्या आशीर्वादावर करीत आहे. वीसगाव खोर्यातील शेतकर्यांच्या शेतजमिनी 100 टक्के ओलिताखाली आणण्याचे माझे स्वप्न असून ते मी पूर्ण करणारच ,असे ठाम आश्वासन आमदार संग्राम थोपटे यांनी दिले.
वीसगाव खोरे परिसरात महाविकास आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारार्थ गावभेट दौर्यात नागरिकांशी संवाद साधताना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला. वीसगाव खोरे हे माझे श्रद्धास्थान असून येथील जनतेने कायम माझ्यावर मायेचा आशिर्वाद दिलेला कायम माझ्या पाठीशी आहे. याची मला जाणीव असून तुम्हा सर्वांचे पाठिंब्यावर प्रत्येक गावात कोट्यवधींची विकास कामे करण्याची संधी मिळाली.
या वेळी चौथ्यांदा मला तुमच्या आशिर्वादाची गरज आहे या वेळी आंबेघर, पोम्बर्डी, शिरवली, वेनवडी, उत्रोली, वडगाव डाळ, भाबवडी, हातनोशी, बाजारवाडी मानकरवाडी, धावडी, पळसोशी, वरवडी खुर्द, वरवडी डायमुख, वरवडी बुद्रुक, नेरे, अंबाडे कोळेवाडी, बालवडी गोकवडी, निळकंठ पोळवाडी, खानापूर या गावांतील नागरिकांशी संवाद साधला.
याप्रसंगी भोर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, माजी उपसभापती मानसिंग धुमाळ, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, माजी सरपंच विठ्ठल शिवतरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुकाप्रमुख माऊली शिंदे, तालुकाप्रमुख हनुमंत कंक, राजगडचे संचालक उत्तम थोपटे, युवा नेते अनिल सावले, रमेश बुदगुडे, रामचंद्र बुदगुडे, जगन्नाथ येलगुडे, शिवाजीराव बुदगुडे, शिवसेना जिल्हा संघटक प्रसाद शिंदे, माजी सभापती बाळासाहेब थोपटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आनंदराव आंबवले,
कार्याध्यक्ष भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संदीप नांगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत सागळे, सरपंच भरत बांदल, राजाराम तुपे, दत्तात्रय शिवतरे, सुधीर खोपडे, सुभाष कोंढाळकर, माजी सभापती अंकुश खंडाळे, नितीन दामगुडे, संचालक प्रविण शिंदे, विठ्ठल खोपडे, युवा नेते गोरख मानकर, पै. रामा गोळे, विलास राऊत, उपसरपंच उत्तम खोपडे , संपत दरेकर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





