Pune District : पीएमची लिंक उघडू नका कृषि विभागाचे आवाहन
Updated On:

मलठण : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान) अंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाइलवर PM Kisan list. APK किंवा PM Kisan APK ची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम गायब होत आहे. तरी शेतकऱ्यांनी ही लिंक उघडू नये, असे आवाहन दौंड तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी केले आहे.
दि. १५ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे. परंतु सायबर गुन्हेगार काही बोगस लिंक पाठवून शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करीत आहेत.
पीएम किसान एपीके लिंक उघडताच शेतकऱ्यांची बँक खाती रिकामी होत आहेत. अशी काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरीत जवळच्या संबंधित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी, अशा प्रकारचे जाहीर प्रकटन तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून केले आहे.





