Pune District : विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीसाठी के.ई.एम. रुग्णालयाशी करार

– आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत उपक्रमास मान्यता
मंचर – आदिवासी विकास विभागाचे मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या उपस्थितीत आंबेगाव व जून्नर तालुक्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, निदान, प्रतिबंधात्मक उपचाराकरीता एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडगाव आणि के.ई.एम. रुग्णालय संशोधन केंद्र पुणे यांच्या सामंजस्य करार करण्यात आला.अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडगावचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी दिली.
प्रधानमंत्री जनजाती आदिवासी महान्याय अभियान आणि प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे आयोजित आढावा बैठकीत मंत्री डॉ. अशोक उईके बोलत होते. यावेळी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, उमा खापरे, सुनील शेळके, बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर,आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लिना बनसोड, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त गोपीचंद कदम, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडगावचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई आदी उपस्थित होते.
डॉ. उईके यांच्या हस्ते जिल्ह्यातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेश वाटप, कातकरी लाभार्थ्यांना घरकुलांकरीता वनहक्क दावा बहाल करण्यात आला. तसेच भिमाशंकर सेंद्रिय शेतकरी गट निगडाळे (ता.आंबेगाव) येथील राईस मिलचे दृकश्राव्यप्रणालीद्वारे उद्धाटन करण्यात आले.





