Pune District : महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या भोर अध्यक्षपदी अॅड दीपक चौधरी

भाटघर – महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या भोर अध्यक्षपदी अॅड दीपक चौधरी तर जिल्हा सचिवपदी अॅड. सुरेश शिंदे यांची नियुक्ती महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या भोर तालुका अध्यक्ष पदी पिसावरे येथील अॅड. दीपक वसंत चौधरी तर जिल्हा सचिवपदी अॅड. सुरेश शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. पुणे येथे गुरुवारी (दि.१७) झालेल्या बैठकीत नियुक्ती करण्यात आली.
गुरुवारी महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सययद सिकंदर अली यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष सय्यद सिकंदर अली यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. यादरम्यान असोसिएशनचे कार्याअध्यक्ष अॅड. यशवंत खराडे, सचिव अॅड. प्रवीण नलावडे, राज्य निरीक्षक अॅड. सतिश लांडगे,
पुणे जिल्हा अध्यक्ष अॅड. कल्याण शिंदे व पुणे शहर उपाध्यक्ष अॅड. आशिष ताम्हाणे तसेच भोर बारचे अध्यक्ष अॅड. संतोष बाठे, अॅड. विजय दामगुडे, अॅड. शिवाजी मरळ, अॅड. राजेंद्र मोरे, अॅड. राजेशकुमार बारटक्के, अॅड. कल्पना म्हस्के, अॅड. यशवंत शिंदे, अॅड. शिवाजी पांगारे, अॅड. मधुकर साळवे, पुणे येथील अॅड. भूषण कोकरे, अॅड. श्रीकृष्ण ढेकळे, अॅड. अनिकेत चव्हाण, अॅड. मनाली चौधरी आदी सदस्य उपस्थित होते.
अॅड. दीपक चौधरी हे ३० वर्ष वकील म्हणून कार्यरत असून भोर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्षपद, भोर विभाग विकास सोसायटीचे अध्यक्ष आणि भोर रूग्ण कल्याण समिती सदस्य म्हणून काम पाहिले आहे. भोर तालुका बार असोसिएशन अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी चांगल्या पध्दतीने काम पाहिले असून नोटरी वकील बंधु भगिनींना जास्तीत जास्त मदत करण्याचा व प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अॅड. दीपक चौधरी व जिल्हा सचिव पदी अॅड. सुरेश शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.





