Pune District : अध्यक्षपदी अॅड. भोईटे, उपाध्यक्षपदी अॅड. गिरमे

महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या पुरंदर तालुकापदी नियुक्ती
वाल्हे – महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनच्या पुरंदर तालुका अध्यक्षपदी जेजुरी येथील अॅड. धनंजय ज्ञानेश्वर भोईटे व उपाध्यक्षपदी नीर येथील अॅड. आदेश हणमंतराव गिरमे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे येथे गुरुवारी (दि.17) महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.सय्यद सिकंदर अली यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. यामध्ये ही निवड करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.सय्यद सिकंदर अली यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली. याप्रसंगी असोसिएशनचे कार्याध्यक्ष अॅड. यशवंत खराडे, सचिव अॅड. प्रवीण नलावडे, राज्य निरीक्षक अॅड. अतिश लांडगे, पुणे जिल्हा अध्यक्ष अॅड. कल्याण शिंदे, पुणे शहर उपाध्यक्ष अॅड आशिष ताम्हाणे आदी उपस्थित होते. अॅड. धनंजय भोईटे हे 34 वर्षे वकील म्हणून कार्यरत असून पुरंदर तालुका बार असोसिएशनचे दोन वेळा अध्यक्षपदी भुषवले आहे.
अध्यक्षपदाच्या कालामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने काम पाहिले असून नोटरी वकील बंधू भगिनींना जास्तीत जास्त मदत करण्याचा व प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्तपद देखील भुषवले आहे. अॅड.आदेश गिरमे हे 33 वर्षांपेक्षा अधिक काळ वकील म्हणून कार्यरत आहेत.
पुरंदर व बारामती तालुका व जिल्हा न्यायालयांमध्येही त्यांनी आपला वकिली व्यवसाय केला आहे. आपल्या अशिलांना न्याय मिळवून देणारे सर्वसामान्य जनतेचे वकील म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. त्यांच्या सामाजिक व कायदाक्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.त दरम्यान अॅड. धनंजय भोईटे यांची अध्यक्षपदी व अॅड. गिरमे यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.





