Pune District : नीटच्या परीक्षेत आचार्यची लक्षवेधी कामगिरी

स्वस्तिक सावंत, प्रांजली खैरनार, दिशा आगरवालचे यश
बारामती – बारामतीतील १९२७ आचार्य ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी नीट २०२५ च्या परीक्षेत उत्तम गुण मिळविले आहेत. या परीक्षेत स्वस्तिक सावंत, प्रांजली खैरनार, दिशा आगरवाल यांनी घवघवीत यश मिळविले.
ॲकॅडमीतील स्वस्तिक सावंतने देशपातळीवर ३०४९ वा क्रमांक व ५६६ गुण मिळविले. प्रांजली खैरनार (क्रमांक ३९०२, ५५७ गुण), दिशा आगरवाल (क्रमांक ४२९६, ५५७ गुण) यांनीही उत्तम यश संपादन केले आहे. याखेरीज प्रिती बनकर, यश गाडे, निखिल वीरकर, दिग्विजय घोरपडे, अंकिता मोरे, अर्शद कोरबु, समृद्धी आहेरकर, सिद्धिका सरोदे, अभिजित माने, सायली पवार, हर्षदा ओमासे यांनी ७२० पैकी ५०० पेक्षा जास्त गुण मिळविले आहेत.
संस्थेत नीटचे प्रशिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी या परीक्षेत उर्तीर्ण झालेले आहेत. यावर्षी नीट परीक्षेचे पेपर अवघड गेल्याची चर्चा होती. याचेच प्रतिबिंब निकालातही दिसले आहे. या स्थितीतही विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळविल्याचे आचार्यचे संस्थापक ज्ञानेश्वर मुटकूळे यांनी सांगितले. संस्थेच्या बारामती, इंदापूर, पुण्यातील वाकड आणि रहाटणी येथे शाखा असून नुकतीच गोव्यातही शाखा सुरु केलेली आहे.
वैद्यकीय शिक्षणासाठी गरजेच्या नीटच्या परीक्षेची उत्तम तयारी येथे करून घेतली जाते. त्यामुळे या परीक्षेसाठी तयारी करणारांनी याचा लाभ घ्यावा असे संचालक सुमीर सिनगारे यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांचे संचालक कमलाकर टेकवडे आणि प्रवीण ढवळे यांनी अभीनंदन केले.
—–





