पुणे जिल्हा : कवठे येमाई येथे शिविगाळ करून केला विनयभंग

शिरूर : कवठे यमाई ता. शिरूर येथील मुंजाळवाडी येथील डिंभे धरणाच्या कॅनॉलच्या पुलावर एका महिलेला शिवीगाळ करून तिचा हात पिरघळून तिला खाली पाडून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला आहे. याप्रकरणी विजय सावकार मुंजाळ रा. मुजांळवाडी, कवठे येमाई याच्यावर शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर हकीगत अशी की , दि. २७ जुलै रोजी सायंकाळी ७ वा. च्या सुमारास कवठे येमाई गावच्या हद्दीत मुंजाळवाडी येथील डिंभे धरणाचे कॅनॉल वरील पुलावर विजय सावकार मुंजाळ हा महिलेच्या समोरून आला. व महिलेला घाण घाण शिवीगाळ करू लागला.
तेव्हा ती महीला त्यास म्हणाली की,”तु मला शिव्या देवु नको. असे ती म्हणाली असता त्याने तीचा डावा हात मनगटाजवळ पकडुन पिरगाळला तेव्हा महीला डाव्या कुशीवर पडली.”
आरोपी विजय सावकार मुंजाळ याने फिर्यादीचा विनयभंग करून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईस असे वर्तन केले आहे. सदर महीलेने तक्रार दिल्याने शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंमलदार पो. हवा राउत हे करत आहे.





